मुंबई : महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री हे दिलीप वळसे पाटील असतील. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे महाराष्ट्राच्या गृहविभागाचा कारभार सोपवण्यात आला आहे. १९९० ला दिलीप वळसे पाटील हे पहिल्यांदाच काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते, यानंतर सात वेळेस ते आंबेगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले, म्हणून आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्रीपद मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिलीप वळसे पाटील यांची राज्याच्या गृहमंत्रीपदी निवड करण्यात येईल, ही बातमी सर्वात आधी झी २४ तासने दिली होती, या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. दिलीप वळसे पाटील यापूर्वी देखील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री होते, दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या विश्वासू व्यक्तींपैकी एक मानले जातात.


शंभर कोटी रूपयांच्या वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांच्याकडून झाला, यानंतर परमबीर सिंह हे कोर्टात गेले आणि हायकोर्टाने जेव्हा अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले, तेव्हा अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता या पदी दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे.