मुंबई : काँग्रेसचे (Congress ) महाराष्ट्र प्रदेशचे (Maharashtra) नेतृत्व बदलाचे संकेत मिळत आहे. नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाबाबत (Congress Maharashtra State President) आज मुंबईत चाचपणी करण्यात आली. याबाबत आज बैठक घेण्यात आली. राज्य प्रभारी एच के पाटील यांच्याकडून नव्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चाचपणी करण्यात आली. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जागी बिगर मराठा नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याबाबत चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत बदलाबाबत बैठक झाली. प्रभारी एच. के. पाटील यांनी काल रात्री बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर आता काँग्रेसच्या मंत्र्यांशी चर्चा सुरू केली आहे. प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल रात्री प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याबाबत एच. के. पाटील यांच्याकडे पुन्हा एकदा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे नव्या नेत्याच्या निवडीबाबत चर्चा सुरु झाली आहे.


नव्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत एच. के. पाटील चाचपणी करत आहेत. एच. के. पाटील यांच्यासह अशोक चव्हाण, अमित देशमुख, अस्लम शेख आणि विजय वड्डेटीवार सह्याद्रीवर याबाबत चर्चा करत आहेत. बाळासाहेब थोरात यांच्या जागी बिगर मराठा नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद देण्याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच एच. के. पाटील याअनुषंगाने मंत्री आणि नेत्यांशी चर्चा करत आहेत. बिगर मराठा नेत्यांमध्ये राजीव सातव, नाना पटोले, विजय वड्डेटीवार, नितीन राऊत यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे आता प्रदेशचे अध्यक्षपद कोणाला मिळते, याचीच उत्सुकता आहे.