ध्वजारोहणावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी? कोल्हापूरला जाण्यावरुन अजित पवार नाराज, भुसे, भूजबळही अनुकूल नाहीत?
Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचं सरकार असून 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीवरुन मानपान नाट्य सुरु झाल्याचं बोललं जातं आहे.
Maharashtr Politics : 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्यासाठी मंत्र्यांची काढलेली ऑर्डर पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. कोल्हापुर इथं अजित पवार (Ajit Pawar) ध्वजारोहणाला जाण्यावरुन नाराज असल्याची माहिती आहे. तर दादा भुसे (Dada Bhuse) नाशिकचे पालकमंत्री असताना धुळे झेंडावंदन करण्याची ऑर्डर काढल्याने नाराज आहेत.. दुसरीकडे अमरावतीत भुजबळ जाण्यावरून फार अनुकूल नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. दादा भुसेंनी सीएम शिंदेंकडे (CM Eknath Shinde) नाराजी कळवल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे पुन्हा ध्वजारोहणासाठी ऑर्डर काढण्याची शक्यता आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील पुण्याऐवजी रायगडला ध्वजारोहण करणार आहेत. तर पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहेत. दरम्यान ठरलेल्या ठिकाणी मंत्री ध्वजारोहण करतील अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिलीय...
कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण?
देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – कोल्हापूर
छगन भुजबळ – अमरावती
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील – पुणे
दिलीप वळसे पाटील – वाशिम
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भुसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रविंद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ
धनंजय मुंडे – बीड
धर्मराव आत्राम – गडचिरोली
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
संजय बनसोडे – लातूर
अनिल पाटील – बुलढाणा
आदिती तटकरे - पालघर
शिंदे-पवारांमध्ये कोल्डवॉर?
मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या 'वॉररूम'वरून कोल्ड वॉर सुरू झालाय. खात्याचा संबंध नसताना वॉररुमध्ये अजित पवारांकडून आढावा घेण्यात आलाय. त्यामुळे हे कोल्डवॉर कुठल्या दिशेने जाईल हे लवकरच दिसेल असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी महायुतीवर केलाय. तर तिन्ही पक्ष राज्याच्या विकासासाठी काम करत असल्याचं सांगत राहुल शेवाळेंनी वडेट्टीवारांचे आरोप फेटाळलेयत. तर कुठलंही कोल्ड वॉर नसल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलंय.
राष्ट्रवादीची नवी रणनिती
आगामी निवडणुकांसाठी अजित पवारांकडून तयारी सुरू झालीय. संघटनात्मक बांधणीसाठी अजित पवारांनी आज आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील, झिरवाळ, तटकरे, मिटकरींसह अनेक आमदार उपस्थित होते. यावेळी बैठकीत जिल्ह्या जिल्ह्यात दौरे कसे करायचे याबाबत चर्चा झाली. तसेच राष्ट्रवादीचे 9 मंत्री जनता दरबार भरवणार असल्याची माहिती तटकरेंनी दिलीय...