मुंबई : Dnyandev Wankhede contempt petition : सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना उच्च न्यायालयाने चांगलेच सुनावले आहे. तुमच्याकडून बदनामीकारक विधान होत आहेत. ही बदनामी कुठेतरी थांबायला हवी. अन्यथा तुम्हाला बोलण्यास दिलेली सूटच काढून घ्यावी लागेल, असा स्पष्ट इशारा उच्च न्यायालयाने मंत्री मलिक यांना दिला आहे.(Dnyandev Wankhede contempt petition - Minister Nawab Malik was heard by the Mumbai High Court)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वानखेडे यांच्याबाबत बदनामीकारक विधान करणं कुठेतरी थांबवायला हवं. अन्यथा तुम्हाला वानखेडे यांच्या बाबत बोलायची दिलेली सूटच काढून घ्यावी लागेल, अेस मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांना सुनावले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेला उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. 


न्यायमूर्ती एसजे काथावाला आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने निर्देश दिले की, “प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, मलिक हे ज्ञानदेव वानखेडे यांची  बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या बदनामीतून मलिक यांना काय साध्य करायचे आहे.  हे सतत चालू राहणे योग्य नाही, असे स्पष्ट शब्दात न्यायालयालाने मलिकांना बजावले आहे. मलिक हे वानखेडेच्या प्रकरणात  5 फेब्रुवारीपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत.


दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर ( Aryan Khan drugs case )  NCP नेते आणि   मंत्री नवाब मलिक यांनी खोटी कारवाई केल्याचा दावा केला. त्यानंतर तत्कालीन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत आणि त्यांचे खरे नाव 'समीर दाऊद वानखेडे' आहे.  समीर वानखेडे यांचा जन्म दाखला खोटा असल्याचा दावाही केला. त्यांनी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप केला आहे.


तसेच त्यांच्या नावावर नवी मुंबईत बार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्याचा पारवानाही कमी वय असताना घेतला गेला होता, असा दावा केला होता. त्यानंतर झालेल्या ठाणे जिल्हाधिकारी यांच्या चौकशीत ही बाब उघड झाली. त्यानंतर ठाणे जिल्ह्याकारी यांनी वानखेडे यांच्या सदगुरु बारचा परावाना रद्द केला.