मुंबई :  मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जनतेला स्वच्छतेचा मंत्र दिला आहे. स्वच्छतेची जबाबदारी ही काहीजणांची नाही, तर सर्वांची असून यासाठी दुसऱ्यांकडे बोट दाखवू नका, असा सल्ला सचिनने दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेच्या सहकार्याने प्रायोगिक तत्वावर विकासाचे एक मॉडेल विकसित केले जाणार आहे. या मिशन २४ च्या शुभारंभासाठी माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकर महापालिका मुख्यालयात उपस्थित होता. पालिका आयुक्त अजोय मेहतांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला. यावेळी हा सल्ला सचिनने दिला.


एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सचिन महापालिका मुख्यालयात आला होता. मुंबई फर्स्ट आणि अपनालय या संस्थेच्यावतीने मुंबई महापालिकेचा एम पूर्व विभाग प्रायोगिक तत्वार विकसित केला जाणार आहे. यासाठी या परिसरातील झोपडपट्ट्या दत्तक घेऊन त्याठिकाणी सर्व मुलभूत सुविधा पुरवल्या जाणार आहेत.