मुंबई : राज्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने रुग्णांची हेळसांड होणारे अनेक फोटो व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर येऊ लागले आहेत. त्यावर टीका करताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील कोरोना संसर्गीत रुग्णांचे हाल पाहता. विरोधी पक्षाने ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, कुठल्याही क्षणी काय होईल हे सांगता येत नाही अशी राज्यात अवस्था आहे, कचऱ्याचा गाडीमध्ये मृतदेह नेला जातो, सरणाला लाकडे नाहीत, खुर्चीत बसून ऑक्सिजन दिला जात आहे. 


जे राज्यात चित्र दिसत आहे ते एक पंचमांशचा भाग आहे, राज्यात कोरोनाबाबत दयनीय अवस्था आहे. मुख्यमंत्री यांना विनंती आहे आम्ही भाजप कार्यकर्ते सांगाल ते काम करू आम्ही, वाट्टेल ते करा पण लोकांचे जीव वाचवा, असेही दरेकर यांनी म्हटले आहे. 


प्रशासकीय अनास्था असल्यानेच राज्यात कोरोना विषयक उपचार यंत्रणा उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याचेही टीका त्यांनी यावेळी केली.