कल्याण : लहानपणी अनेक जणांना काही न काही उलटसुलट खाण्याची सवय असते. काही जण नाणे खातात तर काही कागद वगैरे. लहान मुलीला अशाच प्रकारे केस खाण्याची सवय लागली. केस खाऊन खाऊन या मुलीच्या पोटात मोठ्या प्रमाणात केसाचा गोळा जमा झाला. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करुन पोटातून हा गोळा काढला. (Doctors removed 650 grams of hair from the stomach of a 12 year girl in Kalyan)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नक्की प्रकार काय?  


वरील हा सर्व प्रकार कल्याणमधील आहे. कल्याणमधील ही मुलगी 2 वर्षांची असल्यापासून डोक्यावरचे केस खेचून काढून ते खायची. ती मुलगी आता 12 वर्षांची आहे. दररोज केस खात असल्याने तिच्या पोटात हा केसाचा गोळा तयार झाला. परिणामी तिच्या पोटात दुखू लागलं. त्यानंतर या मुलीला कल्याणमध्ये एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपूर्वी तिच्या पोटावर ओपन सर्जरी करण्यात आली. याद्वारे पोटातून तब्बल 650 ग्रॅमचा केसाचा गोळा काढण्यात आला. सध्या ही मुलगी सुखरुप असल्याचं सांगितलं जात आहे.  


मानसिक आजाराचा बळी
    
"ट्रायकोफॅगिया या मानसिक विकाराने ग्रस्त असलेल्यांमध्ये हा प्रकार दिसून येतो, असं कल्याण पूर्वेतील स्टार सिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन रोहित परयानी यांनी सांगितलं.