डोंबिवली : डोंबिवलीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. डोंबिवली पश्चिममधील अतिधोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळल्यामुळे ही दुर्घटना झाली आहे. गोडसे असं या इमारतीचं नाव आहे. या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा कल्याण-डोंबिवलीच्या धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. डोंबिवली स्टेशनच्या जवळच ही इमारत आहे. विकास फडके असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. झोपलेले असताना इमारतीचा स्लॅब त्यांच्या डोक्यावर कोसळला. जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिकडेच त्यांचा मृत्यू झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुन्या असलेल्या या धोकादायक इमारतीला महापालिकेने खाली करण्याची नोटीस मालकांना दिली होती, पण तरीही ही इमारत खाली करण्यात आली नव्हती. त्यामुळे इमारतीत लोकं राहत होती. या इमारतीच्या खाली काही दुकानंही आहेत. महापालिकेचे अधिकारी याठिकाणी दाखल झाले असून ते इमारत खाली करत आहेत.