Dombivali MIDC Blast Latest Update: गुरुवारी (23 मे 2024) रोजी डोंबिवलीतील एमआयडीसीणध्ये असणाऱ्या एका केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घडना घडली. अतिशय भीषण स्वरुपातील या स्फोटामुळं एमआयडीसी भागातील बहुतांश कंपन्यांचं नुकसान झालं, तर स्थानिक रहिवाशांच्या घरांच्या काचाही फुटल्या. आतापर्यंत या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून, या दुर्घटनेमध्ये काही कामगार आणि नागिरकांनाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवलीच्या अमुदान कंपनीत झालेला हा स्फोट इतका मओठा होता की, 200 मीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्याचीही माहिती मिळाली. या स्फोटानंतर केजीएन केमिकल कंपनी, मेहता पेंट, सप्त वर्ण आणि एका शोरूममध्येही आग लागली होती. स्फोटाचं स्परुप इतकं भीषण होतं की यामध्ये 64 जण जखमी झाल्याची प्राथमिक नोंद आढळते. सदर घटनेनंतर जखमींना तातडीनं डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर नेपच्यून हॉस्पिटलमध्ये 15 जणांवर उपचार सुरु असून त्यातील चारजणांवर अतिदक्षताविभागात उपचार सुरु असल्याचंही सांगण्यात येत आहे. 


हेसुद्धा पाहा : बॉयलरचा स्फोट, धुराचे लोट आणि 2 ते 3 किलोमीटरपर्यंत हादरे...डोंबिवलीतील आगीचे भीषण फोटो


 


गुन्हा दाखल... 


डोबिंवली एमआयडीसी कंपनी रिअॅक्टर स्फोटाप्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता या कंपनीच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता आता कारवाईला वेग मिळाला असून, या भागामध्ये अद्यापही बचावकार्य सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. 


स्फोट झाल्याक्षणी नेमकी काय होती स्थिती? 


डोंबिवली एमआयडीसीमध्ये गुरुवारी पहिला स्फोट झाल्यानंतर काही क्षणात कंपनीतून आगीचे लोट दिसू लागले. काळ्या धुरानं डोंबिवलीचं आभाळ व्यापलं आणि एकच भीतीची लाट पाहायला मिळाली. कंपनीमध्ये ज्वलनशील घटकांचा मोठा साठा असल्यामुळं स्फोटांची मालिका सुरु होऊन एकामागून एक आगडोंब उसळण्यास सुरुवात झाली. स्थानिकांच्या माहितीनुसार आठहून अधिक स्फोट झाले आणि त्यामुळं इथं लोखंडांचे तुकडे, राख असंच चित्र पाहायला मिळालं. रात्री उशिरापर्यंत इथं अग्निशमन दलानं आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. 


दरम्यान स्फोटाच्या दुसऱ्या दिवशीही घटनास्थळी सर्च ऑपरेशन सुरू असून, इथं NDRF आणि  TDRF चे जवान ढिगाऱ्याखाली कोणी अडकलं तर नाही, याचा शोध घेत आहेत. जिथं स्फोट झाला त्या ठिकाणी सर्व सामान छिन्न विच्छिन्न अवस्थेत दिसून येतंय. तर, संपूर्ण कंपनीही उध्वस्त झाल्याचं विजारक चित्र पाहायला मिळत आहे.