घरगुती गॅस महागाईने भडकला; आजपासून वाढीव दर लागू, पाहा तुमच्या शहरातील दर
Domestic LPG Cylinder Price Hike : 6 ऑक्टोबर 2021 नंतर प्रथमच आजपासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. तुमच्या शहरात घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत किती आहे ते जाणून घ्या.
मुंबई : घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाली आहे. नवीन दर आजपासून (22 march) लागू होणार आहेत. 6 ऑक्टोबर 2021 नंतर घरगुती LPG सिलिंडरचे दर वाढले आहेत. आजपासून दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवरून 949.5 रुपये झाली आहे.
कोणत्या शहरात घरगुती सिलिंडरचे दर किती वाढले
मुंबईत घरगुती सिलिंडरची किंमत 949.50 रुपये इतकी झाली आहे. तर कोलकता येथे घरगुती सिलिंडरची किंत 976 रुपये असणार आहे. चैन्नईमध्ये घरघुती सिलिंडरचे दर 965रुपये असणार घरघुती सिलिंडरचे दर 6 ऑक्टोबर 2021 रोजी वाढवण्यात आले होते. त्यानंतर एलपीजीच्या घरगुती सिलिंडरमध्ये करण्यात आलेली ही पहिलीच दरवाढ आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे
अनेक दिवसांनी डिझेल-पेट्रोलच्या दरातही पुन्हा एकदा वाढ झाली आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली आहे. वाढलेले दर आजपासून (मंगळवार) लागू झाले आहेत.
मुंबईत आज पेट्रोलचे दर 110.77 रुपये इतके आहेत. तर डिझेलची किंमत 94.94 रुपये इतकी आहे.
नागपूरमध्ये आज पेट्रोलची किंमत 110.53 रुपये इतकी आहे. तर 93.35 इतकी रुपये आहे.
जागतिक बाजारपेठेतही कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. रशिया युक्रेन युद्धाआधी कच्च्या तेलाचे दर 100 डॉलरच्या खाली होते. आज ते 118 डॉलर प्रति बॅरल इतके आहेत.