मुंबई : सध्या सर्वत्र थर्टीफस्ट आणि न्यू इअर सेलिब्रेशनचा मूड आहे. सर्वच आता मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याच्या तयारीत आहे. सर्वच पार्टीच्या मूडमध्ये आहेत. पार्टीला हमखासपणे पिझ्झा (Pizza) मागवला जातो. हाच पिझ्झा आता भाव खाणार म्हणजेच महागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Dominos Pizza maker Jubilant Foods is considering raising pizza prices in new year 2022)  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नव्या वर्षात तुमचा पिझ्झा महागण्याची चिन्हं आहेत. डॉमिनोज पिझ्झा (Dominos Pizza)  बनवणाऱ्या ज्युबिलिअंट फुड्स (Jubilant Foods) कंपनीचा पिझ्झाच्या किमती वाढवण्याचा विचारात आहेत. पिझ्झाच्या किंमतीत 2016 पासून वाढवलेल्या नाहीत. त्यामुळे डॉमिनोज पिझ्झाच्या किंमती वाढवण्याचा विचार सुरु झाला आहे. 



ज्युबिलिअंट फुड्स कंपनीचा पिझ्झाच्या विक्रीत सर्वात मोठा हिस्सा आहे. गेल्या 5 वर्षातील कंपनीनं बाजारात डॉमिनंट पोझिशनमध्ये आल्यानंतर आता किंमती वाढवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे आता पिझ्झाचे दर नववर्षात वाढतील तेव्हा वाढतील, मात्र त्याआधी तुम्ही तुमचा खिसा हलका करण्यासाठी तयार रहा. 


फक्त दरवाढीच्या चर्चेने शेअर्स वाढले


दरम्यान पिझ्झाच्या किंमती वाढवण्याच्या बातम्यांमुळे ज्युबिलिअंट फूड्स चा शेअर आज पाच टक्के वधारला आहे. त्यामुळे फक्त दरवाढीच्या बातम्यांमुळे  ज्युबिलिअंट फूड्सची चलती पाहायला मिळतेय.