मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीवेळी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील लोकल ट्रेन पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. परंतु, उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोध दर्शविला आहे. मुंबई रेड झोनमध्ये येत असून याठिकाणी लोकल ट्रेन सुरु झाल्यास गर्दी रोखता येणार नाही. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका वाढेल. त्यामुळे केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्यास परवानगी देऊ नये, असे आठवले यांनी म्हटले आहे. तसेच रेड झोन असलेल्या भागांतील लॉकडाऊन वाढवण्याची मागणीही रामदास आठवले यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Lockdown : पंतप्रधानांकडे उद्धव ठाकरेंच्या 'या' महत्त्वाच्या मागण्या

कालच व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. अत्यावश्यक सेवेवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एसटी आणि बेस्ट सेवा सुरु आहे. पण, या बसेसची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे लोकल ट्रेन सुरु कराव्यात, अशी विनंती उद्धव यांनी केली होती. 


आज पंतप्रधान मोदी करू शकतात या घोषणा


या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांना १५ मेपर्यंत लॉकडाऊन कशाप्रकारे शिथील करणार, याचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. दरम्यान, आज रात्री आठ वाजता पंतप्रधान मोदी देशवासियांशी संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांच्याकडून लॉकडाऊनसंदर्भात एखादी महत्त्वाची घोषणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.