मुंबई : कोरोनाला (Corona) गांभीर्यानं घ्या, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी दिलाय. चौथी लाट (Corona Fourth Wave) येऊ नये, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लसीकरण (Vaccination) वाढवलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या चीनमधून (China) कोरोनाचा उद्रेक झाला, त्या चीनमध्ये आज पंधरा पेक्षा जास्त शहरं लॉकडाऊन (Lockdown) झाली आहेत. त्यामुळे कोरोला हलक्यात घेऊ नका, याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. तो आजार बाहेर पसरू नये. चौथी लाट येऊ नये अशीच सर्वांची अपेक्षा आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 


अजूनही काहीजण लसीकरणाबाबत प्रतिसाद देत नाहीत, ग्रामीण भागात कोरोनाला जास्त गांभार्याने घेत नाहीए, ही वस्तूस्थिती आहे. पण आपण लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे अशा सूचना अजित पवार यांनी केली आहे. 


दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा स्फोट
चीनपाठोपाठ दक्षिण कोरियामध्ये कोरोनाची लाट आली आहे. दक्षिण कोरियामध्ये बुधवारी एका दिवसात कोरोनाचे तब्बल 4 लाख रुग्ण एका दिवसात आढळलेत. त्यामुळे दक्षिण कोरियामधले या घडीची रुग्णसंख्या तब्बल 76 लाखांवर गेली आहे. हा ओमायक्रॉनचा कहर समजला जात आहे. 


चीनमध्येही कोरोनाच्या गुप्त ओमायक्रॉन व्हेरियंटने मोठे रूप धारण केले आहे. चीनमध्ये कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच रूग्णांची संख्या दररोड तब्बल 5 हजारांच्या पुढे गेली आहे. ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी चीन प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. इथली 5 कोटी जनता घरांमध्ये कैद झाली आहे.