भारदस्त आवाज हरपला, वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन
35 वर्षाहून अधिक काळ वृत्तनिवेदन केलेले प्रदीप भिडे यांचं निधन
मुंबई : भारदस्त आवाज, सुस्पष्ट उच्चार आणि प्रसन्न व्यक्तिमत्व लाभलेले, मुंबई दूरदर्शनवर सुमारे 35 वर्षाहून अधिक काळ वृत्तनिवेदन केलेले प्रदीप भिडे यांचं आज दीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झालं.
रत्नाकरी मतकरी यांच्या आरण्यक, आता तरी शहाणे व्हा, अशा नाटकातून त्यांनी भूमिका केल्या. अनेक जाहीराती त्यांनी आपल्या भारदस्त आवाजाने लोकप्रिय केल्या.
ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात प्रदीप भिडे यांनी जनसपर्क अधिकारी म्हणून काम केलं होतं. त्यानंतर ते मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये वृत्तनिवेदक म्हणून नोकरीला लागले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे.