मुंबई : शहर आणि परिसरमध्ये २९ ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसादरम्यान डॉप्लर रडारची चांगली मदत झाल्याचा दावा मुंबई हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी केलाय. त्यामुळे भविष्याचा विचार करता आणखी डॉप्लर रडारची मागणी केलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र मुंबईसारख्या शहरासाठी एका डॉप्लर रडारावर विसंबून रहाणे धोक्याचे असून दुसरे डॉप्लर रडार आवश्यक असल्याचं होसाळीकर यांनी स्पष्ट केलंय.  


मुंबई महापालिकेच्या माध्यमातून दुसऱ्या जागेच्या शोधात आहोत. जागांची पहाणी केली आहे. पालिकेने जागा लवकर उपलब्ध करून दिल्यास पुढच्या दुसरे डॉप्लर रडार २ ते ३ वर्षात उभे केले जाईल असं होसाळीकर यांनी सांगितले.