मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी इंदू मिल (Indu Mill) या ठिकाणी जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या (Ambedkar memorial) कामाची पाहणी केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्यदिव्य स्मारक लवकर व्हावं म्हणून उपमुख्यमंत्री, आमदार, स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्यासोबत आज कामाची पाहणी केली. सर्वांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर पूर्ण व्हावं यासाठी आलो आहे'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कामं प्रगतीपथावर आहे. स्मारकाचा बेस तयार झाला आहे. हे स्माकर लवकरच साकारलं जावं अशी आमची इच्छा आहे. या प्रकल्पात 68 टक्के भाग हरित ठेवण्याचा प्रयत्न आहे. कामाला चालना देण्यासाठी आलो आहे. मार्च 2024 ची तारीख आहे. पण त्याआधी व्हावं असा आमचा प्रयत्न आहे.'


'बाबासाहेब सगळ्यांचे आहे. एक-दोघांचे नाही. त्यामुळे सर्वसमावेशक समिती बनवण्यात येईल. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. स्मारक उभारताना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेतली जाईल. असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.


मुंबईतील इंदू मिल येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं हे भव्य स्मारकाचे काम सुरु आहे. या ठिकाणी 350 फुटाचा पुतळा बसवण्यात येणार आहे. या स्मारकासाठी सुमारे 1100 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.