मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयला मोठ यश मिळालं आहे.  डॉ. दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तुल सीबीआयच्या हातील लागलं आहे. हत्याकरून अरबी समुद्रात फेकलेलं पिस्तुल सीबीआयने शोधून काढलं आहे. पुण्यात 2013 साली डॉ. नरेंद्र दाभोलकरांची मॉर्निंग वॉकला गेले असता अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. ठाण्याजवळच्या खारेगाव खाडीतून हत्येचं पिस्तुल शोधून काढण्यात आलं आहे. सीबीआयने हे पिस्तुल तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळा अर्थात फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवलं आहे.अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तुल शोधून काढण्यात आलं आहे. 



डॉ. दाभोलकर यांची हत्या ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची हत्या कोल्हापूरमध्ये फेब्रुवारी 2015 मध्ये झाली. दाभोलकर आणि पानसरे यांच्या निकटवर्तीयांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. 



2013 पासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दाभोलकरांचे मारेकरी न सापडल्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पिस्तुल सापडल्यामुळे सीबीआयला मोठं यश मिळालं आहे. तपास आता पुढे सरकला असून लवकरच मारेकरी पोलिसांच्या ताब्यात असतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.  सीबीआयने दाभोलकर हत्येप्रकरणात प्रमुख आरोपी म्हणून वीरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे यांच्यासह सात जणांना अटक केली होती.