पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : शेती हा मानवी जीवनात खूप महत्वाचा हिस्सा आहे. देशाची आर्थिक व्यवस्था बहुतांशी शेतीवर अवलंबून आहे. यामुळेच शेतीला वेगळे महत्त्व दिले जाते. शेतकऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. पण शेती करताना शेतकऱ्यांना पेरणीपासून कापणीपर्यंत विविध आव्हानांचा सामना करावा लागतो. नैसर्गिक आपत्तीपासून ते पिकांच्या विक्रीपर्यंत अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.   (dr parag who working with nasa make model which can help to save crop see details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गारपीट, अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळ यांसारख्या आपत्तींमुळे शेतकऱ्यांच नेहमी मोठं नुकसान होत. पण आता एका मॉडेलमुळे शेतकऱ्याचं हे होणार नुकसान टाळता येणार आहे. काय आहे हे मॉडेल चला पाहूयात.


हे मॉडेल वाचवणार पिकांना


शेती करताना सर्वात मोठं संकट म्हणजे गारपीट, अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळ. यांसारख्या आपत्तींमुळे पिकांचे अतोनात नुकसान होते. या नुकसानीपासून पीक वाचवण्यासाठी नासामध्ये काम केलेले पराग नावरेकर यांनी एक मॉडेल विकसित केलयं. ज्याद्वारे पीक वेळेत नुकसानीपासून वाचवता येणार आहे. 


मॉडेल अशी देणार माहिती


शेतीचं नुकसान टाळण्यासाठी पराग यांनी एक 'वेदर स्टेशन' विकसित केलयं. जे सेन्सरद्वारे उपग्रह वापरून गोळा केलेला डेटा डीकोड करते. हे मॉडेल प्राथमिक माहिती गोळा करण्याबरोबरच मातीचे प्रकार, वनस्पती, आर्द्रता याविषयीही माहिती देखील देतं.


मॉडेल सांगणार पिकांवरील रोग 


शेती करताना सर्वात फटका पिकांवर किडकनाशंक रोगांचा असतो. किडकनाशंक रोगांमुळे पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. पण आता या रोगांवर मॉडेलच्या माध्यमांतून सहज मात करता येणार आहे. डॉ. पराग यांनी 2017 मध्ये  हवामान केंद्राचे 3 मॉडेल बनवले. स्वत:ची कंपनी सुरू केली. त्यांनी शेतकऱ्यांसोबत काम करणाऱ्या सह्याद्री फार्म्स या कंपनीची मदत घेतली. "हे स्टेशन इन्स्ट्रुमेंट्स आणि सेन्सर्सच्या मदतीने माती, क्षेत्र, आर्द्रता यावर लक्ष ठेवू शकते. यासोबतच पिकातील रोगांचे लक्षण, रोगांवरील निदानही सांगण्यास हे मॉडेल सक्षम आहे", असं पराग नार्वेकर  सांगतात. 



मॉडेल देणार शेतकऱ्यांना इशारा


वेदर स्टेशनच्या माध्यमातून पिकांवर काही अडचण आल्यास मॉडेलद्वारे शेतकऱ्यांना अलर्ट  मिळेल. तसेच या वेदर स्टेशनमुळे हवामान केंद्रावर पाणी व्यवस्थापन, शीतलहरी, पोषक व्यवस्थापन, वाऱ्याची दिशा, आणि वनस्पतींचे बाष्पोत्सर्जन यासारख्या बाबींची माहिती मिळेल. हे मॉडेल 5 किलोमीटरपर्यंतचा भाग कवर करुन तुम्हाला तुमच्या पिकांविषयी माहिती देणार आहे. त्यामुळे अनेक शेतकरी एकच मॉडेल घेऊन आपल्या पिकांवरील संकट टाळू शकता.