मुंबई : आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात कोणते कपडे घालावे आणि कोणते नाही यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. मात्र आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारकडून ड्रेसकोडबाबत नवे नियम ठरवले आहेत. मंत्रालयात आता जिन्स आणि टी शर्ट घालता येणार नाही. शिवाय गडद रंगाचे चित्रविचित्र कपडे घालण्यास राज्य सरकारकडून मनाई घालण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे महिला कर्मचाऱ्यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असं देखील नव्या नियमांत सांगितले आहे. 


काय आहेत ड्रेसकोडचे नवे नियम 
- सर्व कर्मचाऱ्यांचा पेहराव व्यवस्थित असावा.
- महिला कर्मचाऱ्यांनी साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालावे.
- पुरूष कर्मचाऱ्यांनी  शर्ट आणि पॅंट घालावी.
- जिन्स आणि टी शर्ट घालू नये. 
- गडद आणि चित्रविचित्र कपडे घालू नयेत. 
- शक्यतो चपला, बूट. सँडल्स वापराव्यात. 
- कार्यालयात स्लिपर्सचा वापर करू नये.