मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात ड्रोन आधारित पाळत ठेवणारी सुरक्षा यंत्रणा
मध्य रेल्वे मुंबईत करणार ड्रोनचा वापर
देवेंद्र कोल्हटकर, मुंबई : खर्चबचतीच्या दृष्टीने प्रभावी साधन आणि पाळत ठेवण्यासाठी ड्रोन हे एक महत्त्वाचे तंत्रज्ञान आहे. यामुळे मनुष्यबळाचा वापरही मर्यादित होतो. रेल्वे परिक्षेत्र, रेल्वे ट्रॅक, यार्ड, कार्यशाळा इत्यादी ठिकाणी चांगली सुरक्षा व पाळत ठेवण्यासाठी मुंबई विभागाने अलीकडेच दोन निन्जा यूएव्ही खरेदी केल्या आहेत. आरपीएफच्या मॉडर्नरायझेशन सेलमधील चार कर्मचार्यांच्या पथकाला याबाबत प्रशिक्षण देण्यात आले असून या ड्रोन्सच्या उड्डाणासाठी परवाना ही मिळाला आहे.
ड्रोन हा 2 किमी पर्यंत पाळत ठेवू शकतो तसेच २५ मिनिटांपर्यंत तो हवेत उड्डाण करू शकतो. टेक ऑफ वजन २ किलो पर्यंत आहे आणि दिवसा 1280x720 पिक्सेल वर एचडी प्रतिमा कॅप्चर करू शकतो.
ड्रोनचा वापर
- रेल्वे मालमत्तेची तपासणी आणि यार्ड्स, वर्कशॉप्स, कार शेड्स इत्यादींची सुरक्षा सुनिश्चित करणेसाठी.
- रेल्वे परिसरातील गुन्हेगारी आणि असामाजिक बाबींवर पाळत ठेवणेसाठी. त्यामध्ये जुगार खेळणे, कचरा टाकणे, अवैध फेरीवाले इ.
- गाड्यांच्या सुरक्षित संचालनासाठी असुरक्षित/धोकादायक विभागांचे विश्लेषण.
- आपत्ती साइटवर आणि इतर एजन्सींसह समन्वय साधणेसाठी.
- रेल्वे मालमत्तेवरील अतिक्रमणांचे मूल्यांकन करण्यासाठी रेल्वे मालमत्तेचे मॅपिंग करण्यासाठी.
- गंभीर परिस्थितींमध्ये, सणासुदीच्या काळात गर्दीचे निरीक्षण/व्यवस्थापन करणेसाठी.
कोणतेही संशयास्पद क्रियाकलाप लक्षात आल्यास गुन्हेगाराला लाइव्ह पकडण्यासाठी, विभागातील जवळच्या आरपीएफ पोस्टवर माहिती दिली जाते. अशा दोन गुन्हेगारांना रिअल टाइम आधारावर वाडीबंदर यार्ड परिसरात आणि दुसरे कळंबोली प्रांगणात पकडण्यात आले आहे. ते यार्डमध्ये रेल्वेच्या कोच / वॅगनमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करत होते.