मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत चालला आहे. मुंबईमध्ये जास्त लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनासमोर यक्ष प्रश्न उभा राहीला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दाट लोकवस्तीच्या भागात लॉकडाऊन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि निर्जंतुकीरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंदर्भातील सुचना आरोग्य विभागाने महापालिकेला केल्या आहेत. या भागात राज्य राखीव पोलिस दलाची मदत घेण्यातही गृहमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. आरोग्यमंत्र्यांनी नुकतीच मुंबईतील मंत्रिमंडळ सदस्य असलेल्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. गर्दी आणि दाटीवाटीच्या ठिकाणी संसर्ग रोखण्यासाठी महत्वाचे मुद्दे त्यांनी मांडण्यात आले.


गर्दीच्या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दल तैनात करण्यात यावे. नियंत्रण कक्षाच्या मदतीने सीसीटिव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते. मात्र रस्त्यांवरील गर्दीवर  लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची मदत घेण्याबाबत या बैठकीत निर्णय झाला. 



सीसीसीटिव्ही, एसआरपीएफ, ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून लॉकडाऊनचे पालन अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न पुढील काळात होणार आहेत.


धारावीसारख्या दटीवाटीच्या ठिकाणी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाने वेगाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी कोणाच्या घरी शौचालय नसल्याने सार्वजनिक स्वचछतागृहे आणि शौचालयाचा वापर मोठ्या प्रमाणात  अशावेळी अग्निशमन दलाची वाहने आणि पॉवर जेटचा वापर करून हे शौचालये वारंवार स्वछ्च करण्यात येणार आहे. ड्रोनचा वापर करून निर्जुतकीरणासाठी फवारणी कराण्याचे काम करावे असा सुचना आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


शासनाच्या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून तयार अन्न घरपोच देण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. अगदी छोट्या खोलीत जास्त संख्येने लोक राहतात. त्यामुळेही काही लोक रस्त्यावर दिसतात. अशा लोकांसाठी त्या भागातील शाळा उपलब्ध करून दिल्या जाण्याची शक्यता आहे.