ड्रग्सचा लेडी डॉन! मुलीचा आवाज काढून करायचा डील्स
ड्रग्सचा लेडी डॉन NCBच्या रडारवर, पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी आखली योजना.
मुंबई: ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट हाती येत आहे. मोहम्मद सुहैल बिलाल नावाच्या ड्रग माफियाचा NCBकडून शोध सुरू आहे. बिलालनं ड्रग्स विकण्यासाठी जी युक्ती वापली ती ऐकून तर अधिकारी देखील चक्रावले. मुलींचा आवाज काढून मोहम्मद सुहैल बिलाल ड्रग्स विकायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एनसीबी अधिकारी एका मोठ्ठ्या ड्रग डिलरचा शोध घेण्यासाठी NCBच्या अधिकाऱ्यांनी मोठी फिल्डिंग लावली आहे. हा ड्रग्स डिलर जेव्हा जेव्हा ड्रग डिलींग करायचा, तेव्हा तो मुलगी असल्याचं भासवत होता. हा सगळा प्रकार पाहून NCBचे अधिकारी देखील चक्रावून गेले आहेत.
मोहम्मद सुहैल बिलाल हा माणूस NCB साठी मोस्ट वॉन्टेड आहे. चिंकू पठाण आणि आरिफ भुजवालाच्या चौकशीत बिलालचं नाव समोर आलं आहे. हा खतरनाक ड्रगपेडलर आहे. बिलाल भारतातच नव्हे तर दुबईमध्येही ड्रग पुरवतो. NCB ने मुंबईजवळ एका ठिकाणी छापा मारला. तिथे १०० किलो एमडी ड्रग तयार करण्याची ऑर्डर बिलालनं दिली होती.
राज्यसभा : शेतकऱ्यांना बदनाम करण्याचे कारस्थान - संजय राऊत
या डेंजर ड्रगपेडलरची मोडस ऑपरेंडी चक्रावणारी होती. एक ख़ास सॉफ्टवेयर वापरुन बिलाल स्वतःचा आवाज एखाद्या मुलीचा असल्याचं भासवत होता. मुलीच्या आवाजातच बिलाल सगळ्या ड्रग पेडलर्सशी बोलायचा. तो आठवड्याला सिमकार्ड बदलायचा.
ज्या ड्रग डीलर्सबरोबरचे बिलालचे चॅट्स समोर आलेत, त्यामध्ये श्वेता नावाच्या मुलीचा उल्लेख आहे. ही श्वेता म्हणजे बिलालच असल्याचा एनसीबीला संशय आहे. त्यामुळे NCB आता बिलालच्या मागावर आहे.
डोंगरीमध्ये ड्रग्जचा कारखाना चालवणारा आरिफ भुजवालाही जेव्हा ड्रग्ज कमी पडायचे तेव्हा बिलालकडेच ड्रग्ज मागायचा. बिलाल मुंबईत जोगेश्वरीला राहतो पण सध्या तो फरार आहे. NCBच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडण्यासाठी योजना तयार केली आहे. त्यामुळे लवकरच बिलाल त्यांच्या जाळ्यात अडकेल ही शक्यता नाकारता येणार नाही.