Cyber Fraud News: मुंबईत पुन्हा एकदा सायबर क्राईमची नोंद झाली आहे. सायबर घोटाळेबाजांनी 
पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचा कथित दावा करून 46 वर्षीय बिझनेसमॅनची फसवणूक केलीये. यावेळी घोटाळेबाजांनी 8.43 लाख रुपयांची फसवणूक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्याने या व्यापारी व्यक्तीला सीबीआय अधिकारी असल्याचे दाखवून त्यांची ऑनलाइन फसवणूक केली. दरम्यान या व्यक्तीने ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


निनावी कॉल आल्याची माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एफआयआरनुसार, अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहणारी ही व्यक्ती औद्योगिक वस्तूंच्या पुरवठा करण्याचं काम करत. या व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की, 17 फेब्रुवारीला त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख एका प्रसिद्ध कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी दावा केला की, त्यांना एक पार्सल मिळालंय जे त्यांच्या नावावर आणि पत्त्यावर होते. पार्सलची खात्री करण्यासाठी, कर्मचाऱ्याने त्यांना एक नंबर डायल करण्याची आणि ग्राहक सेवा केंद्राशी बोलण्याची विनंती केली.


मुंबईतील सायबर पोलीस अधिकारी अनंत तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून लोकांना पार्सलमध्ये ड्रग्ज मिळवून देण्यासाठी आणि लोकांना फसवण्यासाठी आधार कार्डचं नाव तसंच पत्ता वापरण्याबद्दल सायबर फसवणूक करणाऱ्यांकडून धमक्या देणारे कॉल येतायत. या गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला जागरूक राहिलं पाहिजे. तसंच अशा बनावट कॉलर्सचे नंबर ब्लॉक करणं योग्य ठरतं. स्काईप कॉलमध्ये दिसणारा पोलीस गणवेशातील अधिकारी दर्शवतात. मात्र स्वत:ला क्राइम ब्रँच किंवा सीबीआय अधिकारी म्हणवून धमकी देणारी व्यक्ती हे सर्व खोटे लोक आणि फसवणूक करणारे आहेत. अशा व्यक्तींचे फोन उचलू नये.


फसवणूक झालेल्या व्यक्तीच्या सांगण्यानुसार, कथित कर्मचाऱ्याने दिलेल्या सूचनांचं मी पालन केल आणि त्याला बँकिंग तसंट इतर माहिती दिली. यानंतर त्याला एका अधिकाऱ्याचा स्काईप कॉल आला, ज्याने आपली ओळख सायबर अधिकारी प्रदीप सावंत अशी दिली. सावंत यांनी त्यांना सांगितलं की, तुमच्या नावाचे एक पार्सल मुंबई विमानतळावर विमानतळ अधिकाऱ्यांनी जप्त केलंय.


पार्सलमध्ये 'या' गोष्टी असल्याची दिली माहिती


या पार्सलमध्ये कपडे, वैधता संपलेला पासपोर्ट, एका खाजगी बँकेचे क्रेडिट कार्ड आणि 700 ग्रॅम एमडी असल्याची माहिती देण्यात आली. जर या प्रकरणात अडकायचं नसेल तर तुम्हाला डीसीपी साहेबांशी बोलावं लागेल, असंही या व्यक्तीला सांगण्यात आलं. पोलीस आणि कोर्टाचा वाद टाळण्यासाठी या व्यक्तींना हा सल्ला ऐकला कथित डीसीपीशी बोलण्यास तयार झाला.


बँक खात्यातील 8 लाख रूपये केले लंपास


कथित डीसीपींना कॉल केल्यानंतर समोरच्या व्यक्तीने त्यांना धमकीच्या शब्दात सांगितलं की, तुमचे बँक खातं तपासायचंय. त्यामुळे प्राथमिक माहिती द्यावी. यानंतर, फसवणूक झालेल्या व्यक्तीने डीसीपीच्या सूचनांचं पालन केलं आणि बँकिंगची माहिती दिल्यानंतर काही वेळातच त्याच्या बँक खात्यातून 8.43 लाख रुपये काढल्याचा मेसेज आला.