राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई : ड्रग्ज तस्कर तस्करीसाठी एकाहून एक फंडे वापरतात. भारतातून आखाती देशात जाणाऱ्या कांद्यातून आणि आक्रोडमधून ड्रग्ज पाठवले जातात. भारतातून प्रामुख्यानं मसाल्याच्या पदार्थांची निर्यात होते. यात कांदा, मिरची आणि आक्रोडसारख्या वस्तूंचा समावेश होतो. ड्रग्ज माफियांनी तस्करीसाठी याच वस्तूंचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्रग्ज तस्कर चक्क कांद्यातून ड्रग्ज तस्करी करतात. भारतातून परदेशात जाणाऱ्या कांद्यात तस्कर ब्राऊन शुगरची पुडी लपवतात कांदा कापल्यावर त्याच्या अगदी मधोमध ठेवलेली ब्राऊनशुगर स्पष्टपणे दिसते. कांदा महाराष्ट्रातल्या नाशिकमधून निर्यात होतो. ड्रग्ज माफियांचे थेट मुंबई आणि नाशिकमध्ये कनेक्शन असण्याची शक्यता आहे.


कांद्यासारखीच गोष्ट अक्रोडचीही आहे. काश्मीरमध्ये अक्रोडचं उत्पादन होतं. हा अक्रोड देशातल्या सगळ्या भागात पाठवला जातो. या अक्रोडमध्येही ड्रग्ज लपवून आणले जातात. कधी कधी मुंबईतून परदेशात निर्यातही केले जातात.


हिच गोष्ट तिखट मिरचीलाही लागू पडते. परदेशात निर्यात होणाऱ्या मिरचीतूनही ड्रग्ज तस्करी केली जाते. मिरची फोडली असता त्यातून नशेच्या गोळ्या बाहेर येतात. ड्रग्जची तस्करी करण्यासाठी नवनवे मार्ग शोधले जातात. आखाती देशातल्या कस्टम अधिकाऱ्यांनी तस्करीचे हे नवे मार्ग उघड केलेत. हा व्हिडिओ तसा जुना असला तरी तस्करीच्या या पद्धतींचा थेट भारताशी आणि त्यातल्या त्यात मुंबईशी संबंध येतो. त्यामुळे मुंबईतल्या एँन्टी नार्कोटिक्स विभागानं अधिक दक्षता घेतलीय. मुंबई नशेची राजधानी होऊ नये यासाठी सगळ्यांनी खबरदारी घेणं गरजेचं झालं आहे.