मुंबईत पकडले १ हजार कोटींचे ड्रग्ज, अफगाणिस्तानातून आलं हेरोईन
अफगाणिस्तानमधून इराणच्या माध्यमातून इथे ड्रग्ज आणण्यात आले
मुंबई : नवी मुंबईच्या पोर्टमधून १ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. अफगाणिस्तानमधून इराणच्या माध्यमातून इथे ड्रग्ज आणण्यात आले होते. डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलीजन्स ( DRI) आणि कस्टम विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. तस्करांनी हे ड्रग्ज प्लास्टिक पाईपमध्ये लपवून ठेवले होते. हे आयुर्वेदीक औषध असल्याचे ते सांगत होते. ड्रग्ज इम्पोर्टचे कागदपत्र बनवणाऱ्या दोन कस्टम हाऊस एजंट्सना देखील अटक करण्यात आलीय. याशिवाय चार इतर इंपोर्टर आणि फायनान्सर्सना अटक करण्यात आलीयं. दोघांना आज मुंबईत आणलं जाणार आहे.
नेरुलचे एमबी शिपिंग आणि लॉजिस्टिक सॉल्यूशनचे कस्टम हाऊस एजंट मीनानाथ बोडके, मुंब्राचे कोंडीभाऊ पांडुरंग गुंजाळ यांना स्थानिक कोर्टात सादर केलं. इथून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कस्टडीत पाठवण्यात आलंय. हे सर्वात मोठ ड्रग्ज रॅकेट आहे. याआधी अमृतसरमध्ये जानेवारीमध्ये पंजाब पोलिसांच्या एसटीएफने १९४ किलो हेरोइन पकडण्यात आलं होतं. याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आलं.
मोहम्मद नुमान नावाच्या इसमाने दिल्लीच्या सर्विम एक्सपोर्टच्या इंपोर्टर सुरेश भाटीयासोबत भेटवून दिल्याचे आरोपी बोडकेने पोलिसांना सांगितले. भाटीयाला याआधी देखील ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.