मुंबई / पुणे : डीएसके घोटाळा प्रकरणी डी एस कुलकर्णी यांचा भाऊ मकरंद कुलकर्णी याला अमेरिकेला पळून जात असताना मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आलंय. त्यानंतर पुणे पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहेत. विशेष म्हणजे, मकरंद कुलकर्णी याच्याविरुद्ध अगोदरच लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असल्याने विमानतळ कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. जामीन याचिका फेटाळण्यात आल्यानंतर मकरंद फरार होता. सदर प्रकरणी डी एस कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी हेमंती, मुलगा शिरीष, मेहुणी अनुराधा पुरंदरे, जावई केदार वांजपे आणि डीएसकेचे काही सहकारी पुण्याच्या येरवडा तुरुंगात आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीएसके घोटाळ्यात कुलकर्णी कुटुंब तसंच कंपनीच्या अधिकाऱ्यांसहीत सात जणांना अटक करण्यात आलीय. डीएसके घोटाळ्यात जवळपास ३३ हजार लोकांना फ्लॅट विकण्याप्रकरणी २०४३ करोड रुपयांचा घोटाळा समोर आला होता. 



हा घोटाळा समोर आल्यानंतर ३३ हजार गुंतवणूकदारांनी आपल्या तक्रारी दाखल केल्यात. ईडीनं केलेल्या चौकशीत कुलकर्णी कुटुंबाची देशात आणि परदेशात अनेक ठिकाणी संपत्ती असल्याचं समोर आलं होतं. धायरी भागात १२ संपत्ती, पिरंगुट, बाणेर, बावधन, बालेवाडी, किरकटवाडी या भागांतही कुलकर्णी कुटुंबाची संपत्ती असल्याचं समोर आलंय. ही संपत्ती २०० ते ३०० करोड रुपयांची असल्याचं समजतंय.