मुंबई : डीएसकेंना कोठडीत पाठवण्यास एक क्षणही पुरेसा आहे, असा सज्जड दम आज मुंबई हायकोर्टांनं बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णींना दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीएसके जामिनाची रक्कम भरण्यात पुन्हा अपयशी ठरले. जामीनापोटी भरावयाचे ५० कोटी रुपये भरण्याची आजचीही मुदत ओलांडल्यावर हायकोर्टानं हा पवित्रा घेतलाय. 


स्वतःची अवस्था 'सहारा'सारखी करून घेऊ नका, असा सल्लाही कोर्टानं डीएसकेंना दिलाय. पण त्याचवेळी डीएसकेंना तुरुंगात पाठवून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार नाहीत, असंही कोर्टानं नमूद केलंय.  


बँक व्यवहारातील काही तांत्रिक अडचणींमुळे अजूनही पैसे जमा झाले नाहीत असा दावा डीएसकेंकडून कोर्टात करण्यात आला. तर अरविंद प्रभुणे यांनी ५१ कोटी डीएसकेंच्या खात्यात जमा केल्याची हमी हायकोर्टात जातीनं हजर राहून दिली. 


तर १ फेब्रुवारीपर्यंत बँक ऑफ बरोडामध्ये पैसे जमा करण्याची कबुली डीएसकेंकडून देण्यात आली. २ फेब्रुवारीपर्यंत डीएसकेंना लिलावासाठी योग्य अशा मालमत्तेची यादी सादर करण्याचे निर्देश कोर्टानं दिले. त्यामुळे, डीएसकेंना ५ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून दिलासा मिळालाय.