Eknath Shinde Shivsena : दसरा (dussehra) जवळ येत असतानाच महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय घडामोडींनाही वेग येऊ लागला आहे. (Shivsena) शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यावरून आता राजकारण पेटू लागलं आहे. मेळाव्यासाठी शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानाची रस्सीखेच सुरू असतानाच शिंदे गटाने Plan B सुद्धा तयार ठेवला आहे. (dussehra 2022 dasra melava shivsena eknath shinde clan comes up with plan at MMRDA ground)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने मेळाव्यासाठीचा अर्ज केला आहे. हे ठिकाण म्हणजे बीकेसी येथे असणारं एमएमआरडीए (BKC MMRDA) मैदान. 


वाचा : EXCLUSIVE: मुंबई खड्डेमुक्त करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन


प्रथम येणाऱ्यास प्राधान्य हे शिवाजी पार्कबाबत मुंबई महापालिकेचं (Mumbai BMC) धोरण आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर आधी अर्ज करणाऱ्या ठाकरे गटाला प्राधान्य मिळू शकतं. परिणामी शिंदे गटाने (Dasra Melava) दसरा मेळाव्यासाठी एमएमआरडीए मैदानाचा पर्याय तयार ठेवत त्यासाठी अर्जही केल्याची माहिती आहे. 


राज ठाकरे शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला येणार? 
मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांची उपस्थिती शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला असू शकते अशाची चर्चा रंगल्या. पण, आता दसरा मेळाव्याला शिंदे गटाकडून राज यांना आमंत्रण मिळण्याची शक्यता नाही असं शिंदे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केलं आहे. 


शिवसेनेच्या काही जुन्या वरिष्ठ नेत्यांना मात्र मेळाव्याला आमंत्रण असेल अशी चिन्हं सध्या दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या आठवड्यात शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी बैठक घेतली. या दसरा मेळाव्यातून शिंदे गटाने (BMC Elections) मुंबई मनपा निवडणुकीचं रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे.