मुंबई : Chhagan Bhujbal on Raj Thackeray : राजकारणात रडीचा डाव खेळायचे भाजपने ठरवले आहे. यंत्रणांचा शिखंडी सारखा उपयोग होत आहे. ईडी म्हटले की जामीन नाही केस लवकर संपत नाही. ज्यांच्यावर कारवाई व्हायला लागली, त्यातल्या काही लोकांनी भाजप विरोधात बोलणंच बंद केले. तर काहींनी भाजपमध्ये प्रवेशच केला.  आता तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे तुम्ही सुद्धा भाजप विरोधात बोलत होतात मग तुम्हाला ईडी नोटीस आली आणि आता सगळं थांबलं. तुम्ही ट्रॅक बदलला, असे खडेबोल राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांना सुनावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात सत्ताधारी आघाडीमधील मंत्री आणि लोकांवर ईडी, सीबीआय आणि आयटीची कारवाई करण्यात येत आहे. मात्र, सरकारच्या त्रुटी दाखवा. मात्र, हा वैयक्तिक हल्ला होतोय. कायद्याने उत्तर कधी देता येईल. जेव्हा पूर्ण ईडीची कारवाई होईल, त्यानंतर कोर्टात उभं राहायचं तर त्यालाही वेळ लागणार, असे भुजबळ म्हणाले. 


तुम्हाला जे करायचे ते करा. तुम्ही आम्हाला सिहासनावरून खाली खेचा पण यंत्रणाच्या माध्यमातून नेस्तनाबूत करण्याचा प्रकार थांबवा. तुमच्यात हिम्मत असेल तर राजकारणाच्या मैदानात लढा, असे थेट आव्हान भुजबळ यांनी भाजपला दिले. दरम्यान, राज्य सरकारचे कायदे एवढे कडक नाहीत जेवढे ईडी तसेच इतर यंत्रणांचे आहेत. त्यामुळे आम्ही कारवाई केली तर त्यांना लगेच जामीन मिळतो, असे भुजबळ म्हणाले.