राज्यात राजकीय उलथापालथ सुरु असतानाही इडीचं धाड सत्र सुरुच
इडीने (ED) आपलं धाडसत्र कायम सुरु ठेवलंय. इडीने आता शिवसेनेच्या माजी मंत्र्याला दणका दिला आहे.
जालना : राज्यात सत्तासंघर्ष सुरु आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने महाविकास आघाडीचं सरकार पडतंय की काय असं चित्र राज्यात निर्माण झालंय. या सर्व प्रकरणामुळे राजकीय घडामोडींना उत आलाय. हा सर्व प्रकार सुरु असताना दुसऱ्या बाजूला ईडीने आपलं धाडसत्र कायम सुरु ठेवलंय. इडीने आता शिवसेनेच्या माजी मंत्र्याला दणका दिला आहे. (ed attaches land building structure and residual plant machinery of jalna sahakari sakhar karkhana at sawargaon hadap shiv sena arjun khotkar)
इडीने अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित असलेल्या जालना सहकारी कारखान्यावर कारवाई केलीय. ईडीने जालन्यातल्या सावरगावमधल्या कारखान्यावर कारवाई करण्यात आलीय. इडीने या कारवाईत कारखान्याची जमीन, बिल्ड़िंग, मशिनरी ईडीनं जप्त केलीय.
अर्जुन खोतकर यांच्यावर जालना साखर कारखाना विक्रीत 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. खोतकरांवरही ईडीने छापेमारी केली आहे.