मुंबई : राज्याच्या राजकारणातून (Maharashtra Politcs) मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationlist Congress Party) दिग्गज नेता आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) माजी मंत्री राहिलेले नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (Enforcement Dirctorate) मोठा झटका दिला आहे. नवाब मलिक यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. त्यामुळे जेलमध्ये असलेल्या मलिक यांना हा मोठा झटका आहे.  (ed enforcement dirctorate give order to former minister nawab malik property seized) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलिकांच्या संपत्तीत कुर्ल्यातील 3 फ्लॅट्स, वांद्रेयातील 2 फ्लॅट्स तसंच धाराशिवमधल्या 147 एकर जमिनीचाही समावेश आहे. नवाब मलिक हे मनी लाँड्रिग केसमध्ये  जेलमध्ये आहेत. तसेच डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याने ते कोठडीत आहेत.  


नवाब मलिक यांना या आरोपाखाली ईडीकडून फेब्रुवारी महिन्यात अटक करण्यात आली होती. त्यानंतर मलिक यांची 2 महिन्यांनी म्हणजेच एप्रिल महिन्यात संपत्ती जप्त केली होती. मात्र आता पुन्हा ईडीने मालमत्ता जप्तीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मलिकांसह कुटुंबियाच्या अडचणीत वाढ झाली आहे.