मुंबई : संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवलीय. ही नोटीस पीएमसी बॅंक घोटाळ्याप्रकरणी असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. २९ डिसेंबरला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. या चौकशीला वर्षा राऊत कशाप्रकारे सामोऱ्या जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


संजय राऊतांच्या जवळचे असणारे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. प्रवीण राऊतांच्या अकाऊंटमधून काही व्यवहार वर्षा राऊतांच्या अकाऊंटमध्ये झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. याप्रकरणी ईडी अधिक माहिती गोळा करतेय. याच पार्श्वभुमीवर वर्षा राऊतांना ईडीने नोटीस पाठवलीय. 


संजय राऊतांनी राज्यसभा निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. या प्रतिज्ञापत्रात प्रवीण राऊतांच्या अकाऊंटमधून वर्षा राऊतांच्या अकाऊंटमध्ये कर्ज घेतल्यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. या व्यवहारासंदर्भात ईडीला अधिक माहिती घ्यायची आहे.