अविनाश भोसले यांना `ही` मालमत्ता करावी लागणार रिकामी, ईडीने पाठवली नोटीस
पुण्याचे व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे.
मुंबई : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले ( Avinash Bhosale ) यांना डीएचएफएल ( DHFL ) आणि येस बँकेची ( YES Bank ) फसवणूक केली. या बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने ( CBI ) अविनाश भोसले यांना अटक केली आहे.
मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टाने अविनाश भोसले यांना ८ जूनपर्यंत सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी भोसले यांना सीबीआयने दिल्लीला नेले आहे.
दरम्यान, ईडीने ( ED ) भोसले यांना पुण्यातील त्यांची मालमत्ता रिकामी करण्यासाठी नवीन नोटीस बजावली आहे. सदर प्रॉपर्टी गेल्या वर्षी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने जप्त केली होती. एबीआयएलच्या भूखंडाचा ताबा घेण्यासाठी ही नोटीस पाठविण्यात आली आहे.