दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई  : दिवाळीनंतर शाळा पूर्णपणे उघडण्याचा विचार शिक्षण विभागात केला जात आहे. ग्रामीण भागात पहिलीपासून, शहरांत पाचवीपासून शाळा सुरू करण्याच्या विचारावर चर्चा केली जाणार आहे. बालरुग्ण टास्क फोर्स, मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच चर्चा करणार आहे. या चर्चेकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत, तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत.  हे वर्ग सुरू असताना मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पहिली ते बारावी असे सर्व वर्ग सुरू करण्याची शिक्षण विभागाची तयारी असल्याचे चिन्ह दिसत आहे. राज्यात दिवाळीनंतर शाळा पूर्णपणे उघडण्याचा शिक्षण विभागाचा विचार केला जात आहे. 


ग्रामीण भागात पहिली ते चौथी आणि शहरी भागात पाचवी ते आठवीचेही वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाची चर्चा आहे.  सध्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत, तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत.  हे वर्ग सुरू असताना मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे दिवाळीनंतर पहिली ते बारावी असे सर्व वर्ग सुरू करण्याची शिक्षण विभागाची तयारी असल्याचे दिसत आहे.  लवकरच शिक्षण विभाग बालरूग्ण टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.