महाराट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द होणार का? पाहा काय म्हणाल्या शिक्षणमंत्री
दहावीच्या परीक्षा होणार का?
दीपक भातुसे, मुंबई : सीबीएसई बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द होणार का असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहे. पण सध्या तरी राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा शिक्षण विभागाचा विचार नाही आहे.
CBSE आणि राज्य बोर्डात मोठा फरक आहे. राज्यात दहावीला बसणारे CBSE चे विद्यार्थी केवळ दीड लाखाच्या घरात आहेत. तर राज्य बोर्डाचे 16 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षा न घेता उत्तीर्ण केलं तर 11 वीच्या प्रवेशात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे राज्य बोर्डाची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा शिक्षण विभागाचा विचार नसल्याचं समजतं आहे.
CBSE बोर्डाचे विद्यार्थी दहावी नंतर याच बोर्डच्या ज्युनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. CBSE वर्षभर विद्यार्थींचे असेसमेंट करत असते, विद्यार्थींना प्रोजेक्ट, असाईनमेन्ट असतात त्या आधारे त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन होऊ शकते. राज्य बोर्डच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी असे काही नसते.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, 'कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी आणि बारावीच्या परीक्षा आपण पुढे ढकलल्या आहेत. इतर बोर्डांनाही आपण अशीच विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी आज निर्णय घेतला आहे. सीबीएसई दहावी बोर्ड परीक्षा रद्द झाल्या आहेत. ते विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यापालन कश्याप्रकारे करणार याबाबत आम्ही अभ्यास करू.'