Latest Egg Rates : (Mumbia News) देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई (Mumbai) शहरामध्ये महागाईमुळं अनेकजण त्रस्त झालेले असतानाच पुन्हा एकदा महागाईची झळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आहे. ऐन थंडीच्याच दिवसांमध्ये शहरात अंड्यांचे (Eggs Rates) दर वाढले आहेत. ही आतापर्यंत विक्रमी दरवाढ ठरत आहे, कारण अंड्यांचे दर प्रची डझनमागे 90 रुपये इतके झाले आहेत. शनिवारी मुंबईत ही नवी दरवाढ लागू झाल्याचं पाहायला मिळालं. अद्यापही काही भागांमध्ये अंडी 84 आणि 80 रुपये डझन इतक्याच दराला विकली जात आहेत. पण, तिथंही नवे दर लवकरच लागू होतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका प्रतिष्ठीत वृत्तपत्राच्या माहितीनुसार एनईसीसी (नेशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी) कडून अंड्यांची (रिटेल) किंमत 78 रुपये प्रती डझन इतकी ठेवण्यात आली होती. ज्यावर विक्रेते 6 ते 10 रुपये जास्त आकारतात. शनिवारपर्यंत अंड्यांचे होलसेल दर 626 रुपये 100 नग इतके असल्याची बाबही समोर आली आहे. 


देशात आलेली थंडीची लाट या दरवाढीमागचं मोठं कारण सांगण्यात येत आहे. शनिवारपर्यंत प्राथमिक स्तरावर विक्रेत्यांनी कुक्कुटपालन करणाऱ्याांकडून अंडी 6.26 रुपये प्रती नग इतक्या दरानं विकत घेत ती 7 रुपये किमतीला विक्रेत्यांना विकली. पुढे ग्राहकांपर्यंत येता येता या अंड्यांचे दर 8 रुपये प्रती नग इतक्यावर आले. परिणामी प्रती डझनमागे अंड्यांसाठी आता 90 - 100 रुपये मोजावे लागत आहेत. थोडक्यात डझनमागे अंडी 10 ते 12 रुपयांनी महागली आहेत. 


हिवाळ्यात वाढतात अंड्यांचे दर.... (Winter wave and egg rates )


मुंबई एग्स ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष आफताब अहमद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार दर हिवाळ्यात अंड्यांचे दर वाढतात. पण, तरीही सध्याची दरवाढ विक्रमी ठरत आहे. सध्या अंड्यांची मागणी वाढली असून, उत्तर भारतातून होणारी मागणी सर्वाधिक आहे. कडाक्याची थंडी, अंड्यांची वाहतूक करण्यासाठीची किंमत आणि जुन्या दरांमध्ये काम करण्यास नकार देणारा मजूर वर्ग या साऱ्याचे थेट परिणाम अंड्यांच्या दरवाढीमध्ये दिसून येत आहे. 


हेसुद्धा वाचा : Weather Update : मुंबईतील तापमानात विक्रमी घट; हवामान खात्यानं दिलेला इशारा सर्वसामान्यांवर करणार 'असा' परिणाम 


 


महत्त्वाची बाब अशी, की बॅचलर राहणारी मंडळी असो किंवा अगदीच नवनवं जेवण शिकणारं कुणी असो. कुठूनही आल्यावर भूक लागली, की पहिली झाव असते ती म्हणजे अंड्यापासून तयार होणारा सोपा पदार्थ बनवण्याकडे. पण, आता हीच अंडी महागल्यामुळं आता ती खायचीच नाहीत का? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.