Mumbai Local Update: अंधेरीतील गोखले पुलाचे काम वेगाने सुरू आहे. गोखले पुलाच्या कामासाठी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित केल्याने काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटे सुटणाऱ्या आठ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोखले पुलाच्या कामासाठी रविवारी मध्यरात्री 1.10 ते सोमवारी पहाटे 4.40 पर्यंत पश्चिम रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकदरम्याम अप-डाऊन हार्बरसह अप-डाऊन धीमा-जलद मार्ग आणि पाचव्या -सहाव्या मार्गिकेवर हा ब्लॉक घेण्यात येईल त्यामुळं रविवारी रात्री उशीरा आणि सोमवारी पहाटे सुटणाऱ्या आठ लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. लोकलचे वेळापत्रक जाणून घेऊया. 


रविवारी रद्द होणाऱ्या लोकल फेऱ्या


- विरार-अंधेरी : रात्री १०.१८
- वसई रोड-अंधेरी : रात्री ११.१५
- चर्चगेट-विलेपार्ले : मध्यरात्री १२.३०


सोमवारी या फेऱ्या रद्द


- अंधेरी-विरार : पहाटे ४.२५
- वांद्रे-बोरिवली : पहाटे ४.०५
- बोरिवली-चर्चगेट : पहाटे ४.५३
- अंधेरी-विरार : पहाटे ४.४०
- अंधेरी-चर्चगेट : पहाटे ४.०५


या लोकलना सोमवारी उशीराने धावणार


- विरार-चर्चगेट : पहाटे ३.२५ (१० मिनिटे)
- बोरिवली-चर्चगेट : पहाटे ४.०५ (१५ मिनिटे)
- विरार-बोरिवली : पहाटे ३.३५ (१० मिनिटे)


मध्य रेल्वेवरदेखील मेगाब्लॉक


मध्य रेल्वेवर रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घोषित करण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ०३.०० पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ०९.५७ ते दुपारी ०१.५० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/नीम जलद सेवा ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर पोहोचतील व त्यांच्या निर्धारित वेळेच्या आगमनापेक्षा १० मिनिटे उशीरा चालतील.