मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेले आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी फेटाळून लावलेत. नाथाभाऊंच्यावर आरोप करणं हा काहींचा आवडता उद्योग असतो, असा टोला खडसेंनी लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधल्या काळामध्ये मोपलवार आणि काही मंत्र्यांबाबत गंभीर विषय झाले पण त्याच्याबाबत काहीच प्रतिक्रिया आल्या नाहीत, असं खडसे म्हणाले. सुनिल तटकरे आणि अजित पवार यांच्या विरोधात आरोप केले, PIL दाखल झाल्या. पण त्यानंतर मागे घेण्यात आल्याचा दावाही खडसेंनी केलाय.


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंविरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्याच्या तयारीत आहेत. वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरमध्ये आयोजित जाहिर कार्यक्रमात दमानियांवर टीका करताना खडसेंनी अपशब्द वापरल्याचा दमानियांचा आरोप आहे.


एकनाथ खडसेंनी मंत्रीपद सोडलं असलं, तरी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ते चांगलेच दुखावले गेलेत. नुकत्याच मुक्ताईनगर इथं झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्वतःला निर्दोष असल्याचं सांगताना त्यांच्यावर आरोप करणाऱ्या अजंली दमानिया यांच्यावर नाव न घेता आगपाखड केली. दमानियांनी केलेले सगळे आरोप निराधार असल्याचं सांगताना खडसेंची भाषा घसरली. 


पाहा काय म्हणाले खडसे आणि दमानिया