Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी आहे. शिवेसना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण (Dhanushyaban) चिन्ह बाळासाहेबांच्या शिवसेनेला (Balasahebanchi Shivsena) मिळालं आहे, या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा हा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा आणि आम्ही घेतलेल्या निर्णयाबरोबर एकरुप झालेल्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि लाखो शिवसैनिकांचा  विजय आहे, हा लोकशाहीचा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या देशात बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो, त्यामुळे आम्ही निर्णय घेतला या राज्यात जो कायदा आहे, घटना आहे, नियम आहे, त्या कायद्याच्या आधारावर आमचं सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो मेरिटवर घेतला गेला आहे. हा निर्णय दिल्याबद्दल मी निवडणुक आयोगाला धन्यवाद देतो, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे. 


हा लोकशाहीचा विजय आहे, हा बहुमताचा विजय आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विजयांचा हा विजय आहे, हा सत्याचा विजय आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.