मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) गंभीर आरोप केला होता. खासदार श्रीकांत शिंदे (shrikant shinde) हे मुख्यमंत्री (CM) यांच्या खुर्चीवर बसून काम पाहत असल्याचा फोटो शेअर करत राष्ट्रवादीने हा आरोप केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी हा फोटो ट्विट केला होता. याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी हा फोटो त्यांच्या निवासस्थानवरील असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (sheetal mhatre) यांनी एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये खासदार सुप्रिया सुळे (supriya sule) या मुख्यंत्र्यांच्या खुर्चीवर (cm chair) बसलेल्या दिसत आहे. त्यांच्यासोबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) बसल्याचे दिसत आहे. (shinde group spokesperson sheetal mhatre share morf photo of ncp Supriya Sule)


ट्विट करत हा फोटो बघा कोण कुणाच्या खुर्चीत बसलंय? असा प्रश्न शीतल म्हात्रे यांनी विचारला आहे. मात्र या फोटोवरुन आता नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण हा फोटो मॉर्फ केल्याचे समोर आलं आहे.


युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रविणकुमार बिरादार यांनी एक फोटो शेअर करत सुप्रिया सुळे य़ांचा फोटो फेक असल्याचं म्हटलं आहे. "वाण नाही पण गुण लागला शिंदेसेना भाजपच्या नादाला लागून आता फोटोशॉप सेना झाली आहे. हा घ्या पुरावा," असं म्हणत प्रविणकुमार यांनी हा फोटो ट्विट केला आहे.



राष्ट्रवादीच्या आदिती नलावडे यांनीही हा फोटो मॉर्फ केल्याचं म्हणत शीतल म्हात्रे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दिली आहे. … आता त्यांना सांगा काय ते Editing, काय ते Morphing, सर्व कसं ओके करणार आहेत पोलीस असं ट्विट करत वरळी पोलीस ठाण्यात शीतल म्हात्रेंच्या विरोधात केलेली तक्रार आदिती नलावडे यांनी ट्विट केली आहे.



श्रीकांत शिंदे यांच्याकडून 'फोटो'बाबत स्पष्टीकरण


"जो फोटो व्हायरल होत आहे. तो माझ्या कार्यालयातील आहे. यापाठीमागे कोणतेही हेतू नाही. अनावधाने 'मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन' हा फलक येथे आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हे राज्याचे आहेत. ते कुठूनही काम करु शकतात. ते पत्रकार परिषद घेणार होते. त्यामुळे त्याची पूर्व तयारी म्हणून हा फलक होता. मुख्ममंत्री हे काम करण्यात सक्षम आहेत. ते 18 ते 20 तास करत असतात. त्यामुळे करण्यात आलेला आरोप चुकीचा आहे," असं स्पष्टीकरण खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे.