मुंबई : Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षासंदर्भात महत्त्वाची बातमी. अमावस्या संपल्यानंतर राज्यपालांकडे अविश्वासाबद्दल पत्र जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उद्या सकाळी 8 वाजून 41 मिनिटांपर्यंत अमावास्या आहे. तोपर्यंत वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका असू शकते. अमावास्या संपताच उद्या प्रहार संघटनेकडून बच्चू कडू राज्यपालांना अविश्वास प्रस्तावाबाबत पत्र देऊ शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेबाबत हालचाली वाढल्याचे दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, भाजपने सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु केल्याचे बोलले जात आहे. त्याचाच एक  भाग म्हणून देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे नव्या संभाव्य सरकारचा मंत्रीपदाचा फॉर्म्युला समोर आला आहे, याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये मुख्यमंत्री - देवेंद्र फडणविस असतील तर उपमुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असण्याची शक्यता आहे. शिंदेना वित्त किंवा नगरविकास खातं दिलं जाऊ शकते.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपने सरकार स्थापन केले तर भाजपचे हे आमदार मंत्री होऊ शकतील. भाजपमधून हे संभाव्य मंत्री पदाचे उमेदवार होऊ शकतात अशी माहिती आहे.


मुंबई आणि कोकण


गणेश नाईक 
रवींद्र चव्हाण 
प्रविण दरेकर
योगेश सागर
नितेश राणे
आशिष शेलार 


विदर्भ 


संजय कुटे 
मदन येरावार 
सुधीर मुनगंटीवार 
चंद्रशेखर बावनकुळे 
संदीप धुर्वे
रणजीत सावरकर 


मराठवाडा


अतुल सावे
संभाजी निलंगेकर 
राणा जगजितसिंह 
मेघना बोर्डीकर 


पश्चिम महाराष्ट्र


चंद्रकांत पाटील 
राहुल कुल
जयकुमार गोरे
राम सातपुते / रणजितसिंह मोहिते पाटील
सुभाष देशमुख / विजय देशमुख 
गोपीचंद पडळकर 


उत्तर महाराष्ट्र 


गिरीश महाजन 
जयकुमार रावल
राम शिंदे
राधाकृष्ण विखे पाटील
देवयानी फरांदे