मुंबई : देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक गोष्टींना हात घातला. कधी कौतुक तर कधी टोला देखील त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, 'देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने या सभागृहाला अनेक विरोधीपक्ष नेत्यांनी उज्वल परंपरा दिली आहे. ही परंपरा या पदावर राहून तुम्ही ठेवाल हा विश्वास आहे. सत्ताधारी पक्ष म्हणून उद्धव ठाकरे हे नेतृत्व करत असले तरी विरोधीपक्ष देखील हा सरकारचा भाग असतो. विरोधीपक्षाचा ही सन्मान सभागृहात होत असतो. चांगल्या कामाला सहकार्य करत असतो. विरोधाला विरोध होणार नाही अशी काळजी आपण घ्याल हा विश्वास आहे. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काम केलं. आम्ही तुमच्यासोबत काम केलं. उद्धव ठाकरेंनी तुम्हाला पाठिंबा याआधी दिला आहे.'


'उद्धव ठाकरे आज ही तुम्हाला विरोधीपक्ष नेता मानायला तयार नाहीत. त्य़ांच्या मनातल्या भावना आणि वेदना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. शत्रू म्हटल्याने शत्रू होत नाही. उद्धव ठाकरे हे आपल्या सारखे राजकारणी नाहीत. हे आपल्याला माहित आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत दौऱ्यावर असताना, शेतकऱ्यांनी देखील उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं अशा भावना होत्या. फडणवीस यांचा स्वभाव सगळ्यांना माहित होते. लोकांच्या प्रश्नांसाठी ते विरोधकासारखे बोलायचे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. बहुमत चाचणी वेळी तुम्ही समोर असता तर आणखी आनंद झाला असता. कालची गोष्ट झाली आता महाराष्ट्राच्या जनतेला आपल्याकडून अपेक्षा आहेत.'


'शेतकरी संकटात आहे. सत्तेत असताना देखील तुम्ही शेतकऱ्यांसोबत होते, आताही आहात. आधीच्या सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केला आहे. त्यात आणखी मदत वाढवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी आपण प्रयत्न करुया. केंद्र सरकारकडे आपण पाठपुरावा करु. आपले पंतप्रधानांसोबत संबंध चांगले आहेत. शेतकरी संकटात आहे. विरोधी पक्ष नेता म्हणून आपण पुढाकार घ्यावा. हुशार, बुद्धीमान आपण आहात. ज्या भावनेने उद्धव ठाकरेंनी आपल्याला पाठिंबा होता. तशीच तुम्ही देखील कराल अशी विनंती करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो.'