Maharashtra Political Crisis Updates: शिवसेना बंडखोरांचं नेतृत्व करत असलेले एकनाथ शिंदे काल रात्री गुजरातला जाऊन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या या दौ-याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याचं समजतंय. गुजरातला गेलेले शिंदे पहाटेच्या वेळी गुवाहाटीत परतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी २४ तासला दिलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गुजरातमध्ये ही भेट झाल्याचं समजतंय. काल रात्री एकनाथ शिंदे गुजरातला गेले होते. तसंच फडणवीसही काल रात्री मुंबईमध्ये नव्हते. दोघंही गुजरातमध्ये भेटल्याची सूत्रांची माहिती आहे. आता या दोघांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.  


एकनाथ शिंदे यांच्या या कथित गुजरात दौ-यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे शुक्रवारी दिवसभर बैठकांमध्ये गुंतलेले असताना शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे रात्री गुजरातमध्ये पोहोचले होते आणि शनिवारी सकाळी गुवाहाटीला परतले.


महाराष्ट्राच्या राजकारणात चेक-मेटचा खेळ सुरू आहे. एकीकडे उद्धव ठाकरे बैठकांवर बैठका घेत आहेत. दुसरीकडे भाजपही सक्रिय झालाय. आसाममध्ये शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसोबत असलेले एकनाथ शिंदे यांनी 38 आमदारांना पाठिंब्याचे पत्र दिले आहे. त्यांच्या एका समर्थक आमदारानेही नवी शिवसेना स्थापन करण्याचा दावा केला आहे.



एकनाथ शिंदे गटाकडून आज आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी आपण कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. आम्ही शिवसेनेतच आहोत. असं ही त्यांनी म्हटलं आहे.