Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना आवाहन केलं आहे. महाराष्ट्रातलं सरकार (Maharashtra Government) अस्थिर करण्याचा भाजपचा (BJP) प्रयत्न सुरु आहे, आता तर आमच्या घरातलाच फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्याला एकनाथ शिंदेंनी यश देऊ नये, ही सगळी गाजरं आहेत, उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) तुमच्याबाबतीत चांगला निर्णय घेतील आणि सैनिक म्हणून परत या असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे याचं बंड शिवसैनिकाला आत्मक्लेश देणारं असं सांगत किशोरी पेडणेकर यांना अश्रु अनावर झाले. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर किती आमदार होते याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सक्षम आहेत. प्रत्येक वेळी शिवसैनिकांना अशा गोष्टींना सामोरं जावं लागतंय. त्याचा आम्हाला आत्मक्लेश होतोय, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. 


संपूर्ण देशात कोविड काळात ज्या मुख्यमंत्र्यांचं कौतुक झालं, संयमी नेतृत्व, शांत, सर्वांना मान सन्मान देणारं नेतृत्व अशी उद्धव ठाकरे यांची ओळख आहे. 


राज्यात ज्या पद्धतीने कालपासून मेलोड्रामा सुरु आहे, तो आम्हा सर्व सैनिकांना आत्मक्लेश देणारा आहे, बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होऊन सारखे सारखे हे दिवस दिसता कामा नयेत अशी प्रार्थना केल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.


निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विनंती करेन, ज्या पद्धतीने भाजपाचा गाजरं दाखवण्याचा कार्यक्रम सुरु आहे, त्याला बळी पडू नका असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं.


शिवसेना हिंदुत्व कधीच सोडणार नाही, हिंदुत्व हे दाखवून आणि मिरवून घेणारं नाही, हिंदुत्व हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सर्व शिवसैनिक घेऊन चालले आहेत असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय.