मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकासआघाडी सरकारचं टेन्शन वाढलं आहे. ठाकरे सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न ही अपयशी ठरला आहे. त्यामुळे सरकारवर टांगती तलवार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्य़ामुळे आता अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांच्या आमदारांना भाव वाढणार आहे. राज्यात छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची संख्या 29 आहे. त्यामुळे जर शिवसेनेचे काही आमदार फुटले तर महाविकासआघाडीला या आमदारांची मदत घ्यावी लागू शकते.


महाराष्ट्रात विधानसभेची सदस्यसंख्या 288 इतकी आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर एक जागा रिक्त झालीये. भाजपकडे 106, शिवसेनेकडे 55, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 53, काँग्रेसकडे 44 आमदार आहेत.


शंकरराव गडाख, बच्चू कडू, आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत. तर विनय कोरे, रत्नाकर गुट्टे, रवी राणा, महेश बालदी, राजेंद्र राऊत, प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिलाय.


राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपने अपक्षांना आपल्याकडे वळवलं होतं. ज्याचा फटका महाविकासआघाडीला बसला आहे. 29 आमदारांपैकी 16 आमदार हे महाविकासस आघाडीसोबत होते तर 13 आमदार भाजपच्या बाजूनं आहेत.