मुंबई : राज्याच्या राजकारणात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या चर्चेत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकासआघाडी सरकारवर टांगती तलवार आहे. कारवाईवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत ही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे कारवाई असं होत नाही. असं ते म्हणाले आहे. (Eknath Shinde First reaction On Uddhav Thackeray)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांनी झी 24 तासवर बोलताना म्हटलं की, 'आम्ही शिवसेनेचे 46 आमदार एकत्र आहोत. शिवसेना पक्षाची विचारधारा हिंदुत्वाची आहे. बाळासाहेब आमचे दैवत आहेत. दिघे साहेबांच्या सानिध्यात काम करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे हिंदुत्वाची जी विचारधारा आहे. ती आम्ही पुढे घेऊन जातोय. जी लोकांच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामधला विचार आहे. त्यामुळे असा विचार घेतला तो बाळासाहेबांची विचारधारा पुढे घेऊन जात आहेत.'


'46 आमदारांनी निर्णय घेतलाय. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचं हिंदुत्व आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार, लोकहिताचं सरकार ही भूमिका आमदारांनी घेतली आहे.'


'मिलिंद नार्वेकर आले तेव्हा उद्धव साहेब यांच्यासोबत बोलणं झालं. चर्चेला पाठवलं पण गटनेते पदावरुन मला काढलं. माझे पुतळे जाळण्याचं काम केलं. आंदोलन केलं मला बदनाम करण्याचं काम केलं. त्यामुळे एकाच वेळेत चर्चा एकीकडे आणि आंदोलन असं होत नाही.'


'आमदारांच्या समस्या आणि अडचणीबाबत वेळोवळी त्यांच्या कानावर घातलं गेलं होतं. उद्धव साहेब म्हणाले होते निर्णय घेऊ. विचार करु.' पक्ष ताब्यात घेण्याची आमची कोणतीही मानसिकता नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. बैठकीनंतर पुढची रणनीती ठरेल. कोणासोबत ही संपर्क केला नाही.'


'आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व घेऊन पुढे जातोय. ते महाराष्ट्रासाठी आवश्यक आहे. बाळासाहेब देशाचे नेते होते. त्यांना आम्ही फॉलो करतोय.'