मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्यावर उद्या सकाळी एच एन रिलायन्स (H N Reliance Hospital) रूग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. पाठीचं आणि मानेचं दुःखण डोकं वर काढल्याने डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. यानंतर दोन-चार दिवस मुख्यमंत्री आराम करणार आहेत. या कालावधीत मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण


सोशल मीडियावर पसरवलं जात असलेल्या वृत्ता कुठलंही तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. आई जगदंबेचा कृपाशीर्वाद आणि तमाम जनतेच्या सदिच्छा उद्धव ठाकरे साहेबांसोबत आहेत. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस आणि पोस्टवर विश्वास ठेवू नये, ही नम्र विनंती. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं ाहे.


मुख्यमंत्र्यांवर उद्या शस्त्रक्रिया


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्यावर उद्या सकाळी एच एन रिलायन्स (H N Reliance Hospital) रूग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. उद्या सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. तपासण्यांनंतर शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली मात्र पुन्हा एकदा मान आणि पाठ दुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला.