मुंबई : आगामी लोकसभा आणि राज्यातील विधानसभा निवडणुका २०१९ होणार आहेत. त्याआधीच महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपविरोधात विरोधक एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या भेटीला महत्व आलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात भाजपने शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न सुरु केलाय. तसेच सत्तेत स्थान असताना शिवसेनेच्या मंत्र्यांना काहीही अधिकार नसल्याने मध्यंतरी तीव्र नाराजी सेनेच्या मंत्र्यानी व्यक्त केली होती. आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर भाजप-शिवसेनेतील दरी वाढली होती. तर शिवसेना सत्तेत राहूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहे. त्यामुळे भाजपला ते जिव्हारी लागत आहे. त्यामुळे शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी भाजपही आक्रमक झालेली  पाहायला मिळत आहे. त्यामुळे सत्तेत असूनही शिवसेना आणि भाजपमध्ये दुरावा अधिकच दिसून येत आहे.


दरम्यान, गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे सत्तेत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, असे संकेत आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची सरकारमध्ये राहण्याची मानसिकता नाही, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे  या भेटीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आलेय. शिवसेना भाजप सरकारमध्ये न राहण्याचे संकेत मिळत आहे. याचपार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकीय घडामोडीवर उद्धव यांनी पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. दरम्यान, शिवसेनेने आपली भूमिका आधी जाहीर करावी नंतर आम्ही आमची भूमिका घेऊ, असे आश्वासन पवार यांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजप सरकार अस्थिर असल्याचे संकेत मिळत आहेत.


एनडीएन सरकारला नारायण राणे यांनी पाठिंबा दिलाय. तसेच सरकारमध्ये ते सहभागी होण्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडींना वेग येणार आहे. राणेंचा सत्तेत सहभाग झाला तर शिवसेनेची कोंडी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र, भाजप राणेंना मंत्रीमंडळात स्थान देण्याला शिवसेनेचा विरोध आहे. तसेच भाजपही शिवसेनेला पाण्यात पाहण्याचा प्रयत्न आहे. शिवसेना सत्तेत राहूनही भाजपविरोधात आंदोलन करत आहे. ते भाजपला सहन होत नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील दुरावा अधिकच वाढत आहे. त्यामुळे उद्धव-ठाकरे यांच्या भेटीला महत्व आले.


गेल्याच आठवड्यात तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ममताही भाजपला अडचणी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, हेच या भेटीतून दिसून येत आहे. त्यामुळे २०१९ पूर्वी त्यांच्या या भेटीमुळे राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.