मुंबई : राज्यातील सुमारे 7 हजार 576 ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 7 आणि 14 ऑक्टोबर अशा दोन टप्प्यात या निवडणुका होणार आहेत. आजपासून आचारसंहिता लागू झालीय. सरपंचपदासाठी थेट निवडणूक हे या निवडणुकांचं वैशिष्टय असणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या टप्प्यात नाशिक-औरंगाबाद-अमरावती महसूल विभागात 3884 ग्रामपंचायत निवडणुका 7 ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत. त्याची मतमोजणी 9 ऑक्टोबरला होणारेय. तर दुस-या टप्प्यात कोकण-पुणे-नागपूर महसूल विभागात 3692 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 14 ऑक्टोबरला होणारेत.16 ऑक्टोबरला मतमोजणी होईल. 


ज्या जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायतींपैकी 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा संपूर्ण जिल्ह्याच्या ग्रामीण क्षएत्रात आचारसंहिता लागू राहील. त्याचप्रमाणं ज्या तालुक्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा तालुक्याच्या संपर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू राहील. पण निवडणूक नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास कामांवर कुठलेही निर्बंध राहणार नाही.