नवी दिल्ली : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे (Thackeray vs Shinde) गटातील संघर्ष वाढतच चालला आहे. दोन्ही गटाकडून शिवसेनेवर दावा केला जात असल्याने हा संघर्ष थेट सुप्रीम कोर्टात (Supreme court) पोहोचला. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह मिळवण्यासाठी दोन्ही गटाने दावा केला. पण आता निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला आहे. इतकंच नाही तर आगामी अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना हे पक्षाचे नाव वापरण्यास देखील दोन्ही गटाला परवानगी मिळणार नाहीये. त्यामुळे दोन्ही गटाला मोठा दणका बसला आहे.


शिवसेना नाव ही वापरता येणार नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह (Election symbol) धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाहीये. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहे.


दोन्ही गटापुढे नवीन आव्हान 


शिवसेना (Shiv sena) आणि धनुष्यबाण (Bow and arrow) हे दोन्ही गटाला वापरता येणार नसल्याने आता दोन्ही गटापुढे नवीन आव्हान उभे राहिले आहे. आता दोन्ही गट काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हा निर्णय सध्या तरी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी लागू असणार आहे.


ठाकरे गटापुढे मोठं आव्हान


शिवसेनेची ओळख आता इतिहास जमा होते की काय असा प्रश्न लोकांपुढे उभा राहिला आहे. कारण धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव हे दोन्ही निवडणूक आयोगाने गोठवल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटापुढे उमेदवार निवडून आणण्याचं मोठं आव्हान असणार आहे.